ताज्या बातम्यासातारा जिल्हा

कापील येथे कृषी कन्यांनी केले वृक्षारोपण

कराड / प्रतिनिधी:-

कापील (ता.कराड) येथील  शासकीय कृषी महाविद्यालच्यावतीने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
वाढत जाणारे प्रदूषण,कमी होणारी झाडांची संख्या व अशा विविध कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाची जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृषी कन्यांनी वृक्षारोपण केले.यावेळी कृषिकन्याच्या हस्ते वड,पिंपळ आणि गुलमोहर यांची रोपे लावण्यात आली.याप्रसंगी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे,सरपंच सौ.कल्पना तानाजी गायकवाड,कृषी सहाय्यक रूपाली भांदिर्गे, तलाठी सुजीत थोरात,पोलीस पाटील तुषार ढापरे,भाऊसाहेब जाधव,शशिकांत मोरे,कृषी कन्या वैष्णवी गायकवाड,वैष्णवी ओहोळ,अमृता पिसाळ,राजनंदिनी फरांदे,दीक्षा रेंगडे,पूजा सावंत यांची उपस्थिती होती.
शासकीय कृषी महाविद्यालय कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.शिवाजी पाटील,कार्यक्रम समन्वयक डॉ.राजेंद्र हासुरे,केंद्रप्रमुख डॉ.उल्हास बोरले,कार्यक्रमाधिकारी डॉ.अर्चना ताठे आणि विषयतज्ञ डॉ.ज्योती वाळके यांनी सदर उपक्रमासाठी कृषी कन्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *