सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात रानभाजी महोत्सव व पाककृती स्पर्धा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात बीएससी बॉटनी फूड सायन्स व हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील विद्यार्थ्यांच्या वतीने रानभाजी महोत्सव व पाककृती स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख परीक्षक व पाहुणे म्हणून बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटणच्या प्राध्यापिका डॉ. मंजुषा शिंदे व सगाम महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ए. एस. साळुंखे होत्या. अध्यक्षस्थानी मायक्रोबायोलॉजीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील होते. या स्पर्धेसाठी एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये प्रथम क्रमांक वनस्पतीशास्त्र विभाग, द्वितीय क्रमांक अन्नशास्त्र विभाग व तृतीय क्रमांक अन्य विद्यार्थ्यांनी पटकावला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रज्ञा यादव यांनी काम पाहिले. डॉ. मानसी पाटील, डॉ. स्मिता अनेकर, प्रा. प्रतीक्षा कदम, प्रा. संग्राम पाटील, प्रा. श्रीराम शिंपी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक बॉटनी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया निकम यांनी केले. परिचय प्रा. डॉ. वैधवी चोपडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अहिल्या वाघमोडे यांनी केले. तर प्रा. डॉ. पद्मा नाळे यांनी आभार मानले.