प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांना मुंन्शी प्रेमचंद्र स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान

कराड/प्रतिनिधी : –
रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमधील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांना संगम अकादमी कोटा, राजस्थान यांच्यावतीने मुंन्शी प्रेमचंद्र स्मृती सन्मान पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार शिक्षा, साहित्य, आणि कला या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, तसेच नँक समन्वयक प्रा. डॉ. गिरीश कल्याणशेट्टी, संस्थेचे अजीव सेवक प्रा. डॉ. ए.के. पाटील, सर्व विभाग प्रमुख, रजिस्टार डॉ. अरुणकुमार सकटे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.