कृष्णा विश्व विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिन सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती

कराड/प्रतिनिधी :-
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी व विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ. भोसले यांच्यासोबत शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षकांकडून मानवंदना स्वीकारली.
याप्रसंगी कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल डमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, डॉ. एस. आर. पाटील, अर्चना कौलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी व विद्यार्थ्यांनी मुख्य सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. यावेळी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, डॉ. युगंतरा कदम, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. वैशाली मोहिते, डॉ. गिरीश पठाडे, डॉ. एन. आर. जाधव, फार्मसीच्या प्राचार्या शुभांगी पाटील, सहा. कुलसचिव अस्मिता देशपांडे, व्ही. वाय. चव्हाण आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
चौकट
स्वातंत्र्य दिन सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची उपस्थिती
कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक पातळीवरील न्यूरोसर्जन तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील नामांकीत न्यूरोसर्जन्स कराडमध्ये दाखल झाले असून, यामध्ये परदेशातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. या परदेशी पाहुण्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्याला लावलेली विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.