आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

मलकापूर नगरपरिषदेस पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतूनच अग्निशमन केंद्र व वाहन खरेदीस मंजुरी 

माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची माहिती

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर नगरपरिषदेस तात्कालिन नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर अग्निसुरक्षा अभियानांतर्गत दि. 6 जानेवारी 2010 मध्ये मान्यता दिलेल्या आराखड्यानुसार तत्कालिन मलकापूर नगरपंचायत, सध्याची नगरपरिषदेस अग्निशमन केंद्र बांधकामासाठी 50 लाख व वाहन खरेदीसाठी 30 लाख निधीस तांत्रिक मंजुरी दिली आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतूनच सदरच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती मलकापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, तत्कालिन नगरपंचायत असताना मलकापूर नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे शहर विकास आराखड्यामधील जागा आरक्षित ठेवून ती अग्निशमन केंद्रासाठी व नवीन प्रशासकीय इमारतीसाठी देण्याच्या  मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार तत्कालिन महसुल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने दि. 8 जुलै 2014 रोजी कब्जे हक्कात घेवून त्याप्रमाणे सदर जागेत मलकापूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाबरोबरच अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे काम सुरु केले. यासाठी  तत्कालिन नगरपंचायतीस 50 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व विस्तारवाढ लक्षात घेता तत्कालिन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व तत्कालिन प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सन 2011 साली अग्निशमन वाहन खरेदीचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबत लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. परंतु, अग्निशमन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने  वाहनाचा निधी प्राप्त झाला नाही. तसेच कोविड-19 प्रादुर्भाव, राज्यामध्ये जुन 2023 रोजी सत्तांतर झाल्याने शासनाने मंजुर निधी वितरण करण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे नगरपरिषदेस सदरचा निधी उपलब्ध होवू शकला नाही. त्यानंतर पालिकेने अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदरचा निधी नगरपरिषदेस वर्ग करण्याची मागणी केली होती. याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच मा. संचालक यांनी दि. 5 मार्च 2024 च्या पत्रामध्ये नमुद केल्याप्रमाणे मलकापूर नगरपरिषदेस अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत दि. 31 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार मंजुर झालेल्या निधीतूनच वाहन खरेदीसह तांत्रिक मान्यता मिळाली असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही सदर पत्रकात म्हटले आहे.

Show quoted text

Related Articles