दिग्विजय साळवेला एमटेकमध्ये गोल्ड मेडल

कराड/प्रतिनिधी : –
मुंढे, ता. कराड गावचे सुपुत्र दिग्विजय दत्तात्रय साळवे यांनी आयआयटी मद्रास कॉलेजमध्ये एमटेक (द्वितीय वर्ष) मध्ये गोल्ड मेडल मिळवत उज्वल यश संपादन केले आहे.
दिग्विजय साळवे यांचा नुकताच कॅलिफोर्निया येथील नामांकित फिजिओलॉजिस्ट नोबेल पारितोषिक विजेते प्रा. ब्रेन. के. कोबाल्का यांच्या हस्ते आयआयटी मद्रास कॉलेजच्या 61 व्या दीक्षांत पदवीदान समारंभात सन्मान करण्यात आला. दिग्विजय साळवे यांना यापूर्वी हायेस्ट ग्रेड पॉईंट म्हणून प्रा. रामाणन राममूर्ती अवॉर्ड, बेस्ट अकॅडमीक रेकॉर्डसाठी प्रा. एम. सिंगापूरम इनडॉमेंट अवॉर्ड, डॉ. बैद्यनाथ मेमोरियल प्राईझचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड, उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून प्रा. एन सिंगापुरे अवॉर्ड अशा अनेक पारितोषिकांनी गौरवण्यात आले आहे.
या यशाबद्दल दिग्विजय साळवे यांचे कोयना बँकेचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह मुंढे गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.