कराडला लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
येथील शिवसेवा सामाजिक संस्था व कराड तालुका लिंगायत समाजाच्या वतीने समाजातील सर्व जाती, पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणवंत विद्यार्थी, त्यांच्या पालकांनी आवश्यक गुणपत्रांसह संयोजकांकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू शेटे व उपाध्यक्ष प्रमोद सुकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धेत मिळवलेले यश, शिवाय चित्रकला व क्रीडा क्षेत्रात तालुका स्तरापासून पुढे मिळवलेले यश अशा विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव होणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन विशेष कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी योग्य त्या गुणपत्रकासह निर्मल ट्रेडर्स, दत्त चौक, कराड येथे करावी. अथवा सुनील महाजन व संजय शेटे यांच्याकडे समाज माध्यमातून पाठवावी, असे आवाहन सचिव दिलीप चिंचकर, संचालक राजन धोकटे, अभिजीत चिंगळे, राजेंद्र घाटे, महेश्री खुंटाळे, सिमा विभुते, सुरेखा डुबल यांनी केले आहे.