सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना मान्यवरांकडून अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना ११ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सिद्धार्थ घाटगे, आदित्य मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक संग्राम पाटील, डॉ. अशोक गुजर, शिवाजीराव थोरात, जयवंतदादा जगताप, आर. टी. स्वामी, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, जे. डी. मोरे, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, बाबासो शिंदे, दत्तात्रय देसाई, वसंतराव शिंदे, सयाजी यादव, संजय पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे, मनोज पाटील, माजी संचालक जयवंत जगताप, ॲड. बी. डी. पाटील, चंद्रकांत देसाई, दिलीपराव पाटील, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, रामकृष्ण वेताळ, घन:श्याम पेंढारकर, प्रमोद शिंदे, नितीन वास्के, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावरकर, मंजिरी कुलकर्णी, पैलवान आनंदराव मोहिते, पंकज पाटील, डॉ. सारिका गावडे, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष धनाजी जाधव, वसीम मुल्ला, सौ. श्यामबाला घोडके, विलासराव पवार, राजेंद्र पवार, रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच श्री. भाग्यश्री पवार, माजी सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, आणेचे सरपंच किसनराव देसाई, श्रीनिवास जाधव, मोहनराव जाधव, बाळासाहेब बागडी, दिलीपराव चव्हाण, एम. के. कापूरकर, जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, वसीम मुल्ला, मलकापूरचे माजी नगरसेवक आबा सोळवंडे, आण्णासो काशीद, राजू मुल्ला, भारत जंत्रे, सूर्यकांत खिलारे, कृष्णा बँकेचे संचालक विजय जगताप, गिरीश शहा, माजी संचालक तातोबा थोरात, महादेव पवार, हेमंत पाटील, हेमंत धर्मे, विवेक पाटील, सूरज शेवाळे, हरिभाऊ पाटील, सुभाष वाडीलाल शहा, मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, बंटी जाधव, प्रदीप पाटील, रमेश मोहिते, युवराज पवार, रमेश लवटे, प्रदीप पाटील, सुधीर एकांडे, एम. के. कापूरकर, नितीन पाटणकर, विजय पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.