सातारा जिल्हाहोम

‘कृष्णा’वर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना त्यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत स्व. आप्पासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी संचालक लिंबाजीराव पाटील, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, संजय पाटील, शिवाजी पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवरांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला असून, आप्पासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे कृष्णाकाठी समृद्धी आली असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ३० जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles