सातारा जिल्हाहोम

बेलवडे हवेलीच्या सरपंचपदी अंजना पवार यांची निवड

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार 

कराड/प्रतिनिधी –

बेलवडे हवेली, ता. कराड गावच्या सरपंचपदी सौ. अंजना प्रकाश पवार यांची सर्वानुमते निवड झाली. सौ. पवार या काँग्रेस पक्षाच्या सदस्या असून त्यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्याने गावातील काँग्रेसच्या सदस्यांना एक ताकद मिळाली आहे. शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार केला.

यावेळी प्रकाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रताप पवार, माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील, महेश कुंभार, शिवाजी इनामदार, अशोक पवार, लालासो पवार, मोहन पवार, प्रकाश पवार, सुशांत इनामदार आदी उपस्थित होते.

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरपंच हा गावचा प्रमुख म्हणजेच एकप्रकारे कुटुंब प्रमुखच असतो. गावातील सार्वजनिक कामे प्राधान्याने मार्गी लावली पाहिजेत. गावातील बंधुता, अखंडता ठेवण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त उपयोग ग्रामस्थांना होण्यासाठी सरपंच व त्यांच्या सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

Related Articles