कराड अर्बन सेवक पतसंस्थेतर्फे सभासदांना 12 टक्के लाभांश
संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कराड/प्रतिनिधी :–
येथील दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी नफा वाटणीचा ठराव मांडून सभासदांसाठी 12 टक्के लाभांश घोषित केला.
सभेस अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, संस्थापक अध्यक्ष सी.ए. दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थेचे सचिव धनंजय शिंगटे केले. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना अध्यक्ष सलीम शेख यांनी म्हणाले, संस्थेची गेल्या चौदा वर्षांतील वाटचाल अर्बनच्या सर्व संस्थांतील सेवकांना आर्थिक उन्नती देणारी ठरली आहे. संस्थेचे भागभांडवल एक कोटी 78 लाख, ठेवी 1229,03 लाख, कर्जे 815.00 लाख असून संस्था एकूण व्यवसायाचा 20 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा पार करीत आहे. संस्थेने 31 मार्च 2024 अखेर नऊ कोटी 80 लाखांची गुंतवणूक, 17 लाखांचा सेवक कल्याण निधी, सन 2023-24 साठी 47.74 लाखांचा नफा झाला आहे. संस्थेतर्फे मा.द.शी. एरम मुकबधीर विद्यालयास पाच लाखांची देणगी देण्यात आली आहे.
सभेस संस्थेचे संचालक गिरीश सिहासणे, संदीप पवार, राजेंद्र कांबळे, संतोष गायकवाड, प्राची वैद्य, प्रदीप कदम, प्रशांत दळवी, अमर भोकरे, सुरेखा कुंडले, किरण मोटे, व्यवस्थापिका सबिना इनामदार, तसेच सर्व संचालक, सभासद यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.