ताज्या बातम्या

बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आशाकिरण’मधील निराधार महिलांना भेटवस्तूंचे वाटप 

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना सौ. जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन आठवड्यांपासून कराड तालुक्यातील व कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौ. जयमाला पाटील यांनी वसतिगृहातील प्रवेशितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच वसतिगृहामध्ये महिलांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती घेत कमतरता असलेल्या सोयी पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी याठिकाणी रहात असलेल्या इच्छुक मुलींना पुढील वर्गांमध्ये प्रवेश देऊन त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वसतिगृहातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय स्टाफ आहे का? याची खात्री करून घेतली. निराधार माता-भगिनींच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला. या सर्व बाबींमुळे उपस्थित माता, भगिनींशी सौ. जयमाला पाटील यांच्याप्रति ऋण व्यक्त करून आभार मानले.

याप्रसंगी सुशीला पाटील, आशा पाटील, प्रभावती माळी, श्रेया लादे, वसतिगृहाचे अधिक्षक अविनाश म्हासुर्णेकर, सहा. अधिक्षक माणिकराव शिंदे, अधिपरिचारिका अनिता चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Related Articles