कराड पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा शांततेत
सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी

कराड / प्रतिनिधी : –
कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शांततेत पार पडली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. नेहमीच वादळी होणारी शिक्षक सोसायटीची सभा यावेळी पूर्ण वेळ चालली. अध्यक्ष वैशाली पवार व उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संचालक दिनेश थोरात,माजी अध्यक्ष अंकुश नांगरे,महेंद्र जानुगडे, मोहन सातपुते, संजय नांगरे, तानाजी पाटील, रमेश देसाई, तात्यासो सावंत, प्रदीप रावलेकर, दत्तात्रय पाटील, शशिकांत कांबळे, मोहन सातपुते, संतोष निकम, शहाजी यादव, आनंदा देशमुख, भालचंद्र थोरात, विनायक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वेणूताई चव्हाण सभागृह या ठिकाणी पार पडली.
संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. नेहमी वादळी ठरणारी वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी मात्र शांततेत पार पडली. यासाठी दिनेश थोरात, भारत देवकांत यांचे प्रयत्न आणि मुत्सध्येगिरी उपयोगी पडली. नवीन इमारत बांधकामाचा आणि जागा खरेदीचा विषय वादळी ठरणार अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. त्याप्रमाणे हा विषय वादळी ठरला. विरोधकांच्या बाजूने महेंद्र जानुगडेे, विकास देशमुख, बाजीराव शेटे व सहकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. महेंद्र जानुगडे यांनी सर्वसामावेशक भूमिका घेतली तर विकास देशमुख यांनी शासकीय अभियंत्या कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी करून स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्रति सभासदांना पुरवल्या. वातावरण थोडे गरम झाले परंतु दिनेश थोरात यांनी दिलेल्या समर्पक उत्तराने सर्व सभासदांचे समाधान झाले. बाकी इतरही विषयावर चर्चा होऊन विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी एकमताने मंजूर करण्यात आले. बँकेचा इतिहासात पूर्ण वेळ चाललेली ही सभा ठरलेली आहे. यशस्वी सभा चालवून सर्व विषय मंजूर करून घेतल्याबद्दल आणि पूर्वजांनी बांधलेल्या इमारतीचे फोटो भविष्यातील आठवणीसाठी नवीन इमारतीमध्ये लावावे अशी मागणी करून नितीन नलावडे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. महिलांची उपस्थिती या सभेला लक्षणीय अशी होती. मात्र महिलांना सभेमध्ये प्रश्न मांडण्यास वाव दिला जावा असेही मत सभासद वंदना जाधव यांनी व्यक्त केले.
सभा यशस्वी करण्यासाठी संचालक शशिकांत तोडकर,आनंदा चाळके, नीलम नायकवडी, प्रदीप कुंभार, प्र.भा.मोरे, संदीप सपकाळ, अंकुश नांगरे, एम. डी. दडस, रमेश जाधव,धनाजी कोळी, संतोष यादव,शंकर मोहिते, पल्लवी यादव, अनुसया पवार, रुक्मिणी सातपुते, वनिता अपशिंगे, सागर पाटोळे यांनी परिश्रम घेतले.
सर्वसामावेशक कार्यकारणी निवडणार
बांधकामासाठी आजी-माजी संचालक, अध्यक्ष, ज्येष्ठ सभासद व नवीन संचालक या सर्वांची कार्यकारणी निवडून त्यांच्या एकमताने नवीन बांधकाम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कराड शहराच्या वैभववात भर घालणारी इमारत उभी करणार.
दिनेश थोरात माजी अध्यक्ष कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी.