कोयना धरणातून नदीपात्रात 21050 क्युसेक पाण्याचा विसर्ग
धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवर, विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता

कराड/प्रतिनिधी –
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासांत तब्बल सात टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवर उचलण्यात आले असून नदीपात्रात 11050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला सध्या धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर असून नदीपात्रात 21050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 85.937 क्युसेक असून धरणाची जलपातळी 2139.03 फुट झाली आहे. सध्या धरणात 78.29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयनानगर येथे 90/3147 मिमी, नवजा येथे 70/3692 मिमी, तर महाबळेश्वर येथे 77/3185 मिमी पावसाची नोंद झाली आहे.