ताज्या बातम्यासातारा जिल्हा

 आ. बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने कराड-उत्तर साठी १२.७० कोटी  निधी मंजूर

 

कराड / प्रतिनिधी : –
कराड-उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील साहेब माजी मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत ३०५४-२०५२ ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरण योजना, ५०५४-४२७३ इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना या योजनांमधून खालील रस्त्यांच्या कामासाठी रक्कम रू.९५.०० लक्ष व मॉडर्न स्कुल अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विशेष दुरूस्ती करणे या योजनेमधून खालील जि.प.शाळांना रक्कम रू.११ कोटी ७४ लक्ष निधी मंजूर होवून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या गावांमधील नागरीकांची रस्त्यांची गैरसोय दूर होवून दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शाळा खोल्यांच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोईसुविधा उपलब्ध होवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.
यामध्ये अ) ३०५४ ग्रामीण मार्ग व पूल निधी योजनेमधून यशवंतनगर गाडीतळ ते मसूर- शिरवडे रस्ता ७३ सुधारणा करणे ता. कराड रू.३० लक्ष, वडगांव कुरणवस्ती ग्रा.मा.७९ रस्ता सुधारणा करणे ता. खटाव रू.२५ लक्ष, ब) ५०५४ इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजनेमधून रा.मा.४ ते वहागांव घोणशी कोपर्डे हवेली-पार्ले बनवडी रस्ता इजिमा १२५ आर.सी.सी. गटरसह रस्ता सुधारणा करणे (भाग- कोपर्डे हवेली ते वडोली निळेश्वर) ता. कराड रू.२० लक्ष, अंगापूर-ब्रम्हपुरी- रहिमतपूर-अंधेरी-कार्तीक स्वामी देवालय रस्ता इजिमा ८७ (भाग- साप ते रहिमतपूर) सुधारणा करणे ता. कोरेगांव रू.२० लक्ष व क) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशेष दुरूस्ती (मॉडर्न स्कूल) योजनेमधून जि.प. प्राथ. शाळा करवडी ता. कराड येथे १ वर्ग खोलीस रू.१५.२५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा रिसवड ता. कराड येथे ८ वर्ग खोल्यांस रू.१२२.० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा इंदोली ता. कराड येथे ३ वर्ग खोल्यांस रू.४५.७५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा नवीन कवठे ता. कराड येथे २ वर्ग खोल्यांस रू.३०.५० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा चरेगांव ता. कराड येथे ३ वर्ग खोल्यांस रू.४५.७५ लक्ष जि.प. प्राथ. शाळा आर्वी ता. कोरेगांव येथे ९ वर्ग खोल्यांस रू.१३७.२५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा साप ता. कोरेगांव येथे ६ वर्ग खोल्यांस रू.९१.५० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा कण्हेरखेड ता. कोरेगांव येथे ३ वर्ग खोल्यांस रू.४५.७५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा बोरगांव ता. कोरेगांव येथे ७ वर्ग खोल्यांस रू.१०६.७५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा सायगांव धामणेर ता. कोरेगांव येथे २ वर्ग खोल्यांस रू.३०.५० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा पाडळी ता., जि. सातारा येथे ८ वर्ग खोल्यांस रू.१२२.० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा फत्यापूर ता., जि. सातारा येथे ७ वर्ग खोल्यांस रू.१०६.७५ लक्ष, जि.प. प्राथ. शाळा अतित ता., जि. सातारा येथे ६ वर्ग खोल्यांस रू.९१.५० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा सायळी ता., जि. सातारा येथे ४ वर्ग खोल्यांस रू.६१.० लक्ष, जि.प. प्राथ. शाळा गोरेगांव (वांगी) ता. खटाव येथे ८ वर्ग खोल्यांस रू.१२२.० लक्ष निधी मंजूर झाला आहे.

Related Articles