लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या वतीने दादा शिंगण यांचा विषेश सत्कार

कराड / प्रतिनिधी : –
लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या वतीने दादासो शिंगण यांचा त्यांनी केलेल्या विविध सामाजिक सेवेची दखल घेऊन त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
त्यावेळी लायन्स क्लब ऑफ कराड च्या नवीन अध्यक्ष मंजरी खुस्पे लायन एम के पाटील लायन जगदीश पुरोहित लायन महेश खुस्पे लायन मंजरी खुस्पे लायन्स कराड ऑफ सिटी हे सर्वजण उपस्थित होते.
दादासाहेब शिंगण यांनी केलेल्या सामाजिक करण्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला, दादा दरवर्षी दिवाळी सणानिमित्ताने न विसरता रिमांड होम मधील अनाथ मुलांसाठी नवीन कपडे व दिवाळीचा फराळ घेऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करतात. आशासेवीका असो, जेष्ठ नागरिक असो किंवा रस्त्यावरून जाताना कोणत्याही व्यक्तीचा अपघात झाल्यास कोणताही विचार न करता त्यांना मदत करतात.
दादासाहेब शिंगण यांनी आजपर्यंत कोविड महाभयंकर काळामध्ये अनेकांचे जीव गेले, त्यावेळी दादांनी शंभरपेक्षा जास्त लोकांचे अंत्यसंस्कार केले आहेत, तसेच बऱ्याच बेवारस नागरिकांना आजारी असलेल्याना दवाखान्यात नेऊन उपचार केलेले आहेत, जर एखादी बेवारस नागरिक मयत झाल्यास दादा त्यांचाही अंत्यसंस्कार करतात.
याची दखल घेऊन लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या वतीने दादासाहेब शिंगण यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष मंजरी खुस्पे, एम के पाटील, दिनेश पुरोहित, महेश खुस्पे व लायन्स क्लब ऑफ कराड चे पदाधिकारी उपस्थित होते.