आयुष्यमान स्पेशलमनोरंजनमहाराष्ट्र
Eaayush Man
Send an email
लायन्स क्लब सातारचा पदग्रहण सोहळा उत्साहात अरविंद शेवाळे यांच्यासह संचालक मंडळांनी घेतली शपथ
54 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
लायन्स क्लब सातारा अजिंक्यचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला अध्यक्षपदी अरविंद शेवाळे यांच्यासह संचालक मंडळाला एमजीएफ बी एल जोशी माजी प्रांतपाल व लायन्स इंटरनॅशनल ट्रेंनर तसेच नवीन सदस्यांना पीएमजीएफ जगदीश पुरोहित यांनी शपथ दिली.
पदग्रहण सोहळ्यात एमजेफ बी एल जोशी माजी प्रांतपाल व लायन्स इंटरनॅशनल ट्रेंनर तसेच नवीन सदस्यांना पीएमजेफ जगदीश पुरोहित यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष लायन अरविंद शेवाळे यांना गोव्हन प्रदान केला. यावेळी स्वागत मावळते अध्यक्ष रामदास चव्हाण यांनी केले त्यांनी मागील वर्षी केलेल्या सेवाकार्याचा आढावा घेतला.
यावेळी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नूतून अध्यक्ष अरविंद शेवाळे यांनी विविध सेवा कार्याबरोबरच पर्मनंट प्रोजेक्ट करण्याचा संकल्प केला.
यावेळी सचिव पदी विजयकुमार जाधव तर खजिनदारपदी अमोल तावरे हे काम पाहत आहेत.
रिजन चेअरमन दिलीप वहाळकर व झोनल चेअरमन डॉक्टर निलेश थोरात यांनी क्लबला शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त सहकार्य करण्याची हमी दिली क्लबचे संस्थापक एमजेफ डॉक्टर बाळकृष्ण जाधव यांनी या क्लबचे कार्य उल्लेखनीय असून यापुढेही तसेच कार्य घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रिजनल मधील विविध क्लबचे लायन्स क्लब एमआयडीसी युनायटेड क्लब लायन्स क्लब फलटण लायन्स क्लब कराड सिटी लाईन क्लब कराड व लायन्स क्लबचे सदस्य पदाधिकारी तसेच क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले तर आभार विजयकुमार जाधव यांनी मानले.
54 1 minute read