ताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा

सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी राबवले विविध उपक्रम

 

कराड / प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोफत नोंदणी आयुष्मान भारत कार्डचे वितरण व आ.भा.कार्ड नोंदणीचे आयोजन एकता मंडळाच्यावतीने करण्यात आले होते

याप्रसंगी बोलताना पै. धनंजय पाटील म्हणाले की कराड दक्षिणचे युवा नेते मा अतुलबाबा भोसले ,कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेशबाबा भोसले, विश्वस्त विनायक भोसले यांचे निष्ठावंत शिलेदार असणाऱ्या तानाजी देशमुख हे गेली वीस वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आजवर त्यांनी अनेक अभिनव तसेच विधायक उपक्रम राबवले असून ते कार्य अविरत सुरू आहे आज त्यांनी प्रभागातील माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या सौजन्याने आयुष्यमान भारत कार्डचे वितरण या ठिकाणी होत असून नोंदणी शिबिराचे आयोजन देखील होत आहे देशमुख यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या बद्दलची तळमळ कौतुकास्पद आहे त्यांच्या हातून समाजाची अविरत सेवा घडत राहील हीअपेक्षा आहे.
यावेळी भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव माजी नगरसेवक सुहास जगताप वृक्षमित्र अजित सांडगे संजय गांधी निराधार योजना समितीचे मा अध्यक्ष संजय पवार ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे सरचिटणीस धनंजय माने सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पंकज पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे शहाजी पाटील धनंजय माने मनसेचे दादा शिंगण महाराष्ट्र राज्य माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा माळी दीपक गावडे अमोल पाटील सूर्यकांत खिलारे दीपक लावंड,सतिष पाटील,विकास शेवाळे, यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

 

Related Articles