कराड शहरासाठी पाणीपुरवठा सुरु
पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश; प्रशासन अलर्ट मोडवर, तात्काळ हालचालीने यंत्रणा कार्यान्वित

कराड/प्रतिनिधी : –
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर मंगळवारी तातडीने स्पॉट भेट देऊन कराड नगरपालिका मुख्याधिकारी, MGP चे अधिकारी, तसेच हायवेचे अधिकारी अशा सर्वांची संयुक्तिक मिटिंग घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे परिस्थिती समजून घेतल्यानंतर, तसेच नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रशासनातील पकड व अभ्यास कराडकरांनी अनुभवला.
आ. चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागाची एकत्रित मिटिंग घेतल्याने सुचविलेल्या पर्यायावर तात्काळ निर्णय घेता आले. तसेच जे निर्णय जिल्हाधिकारी पातळीवर घेणे गरजेचे आहेत, त्यासाठी जिल्हाधिकारी यांना दुसऱ्याच दिवशी कराडला येऊन परिस्थितीची पाहणी करून निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कराड दौऱ्यावर येऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यानंतर ठोस निर्णय कराड नगरपालिका प्रशासनला घेता आले. त्याचमुळे आज पाणीपुरवठा केंद्रातील सर्व कामे पूर्ण झाली असून नदीपात्रातून पाणी उपसा सुरू केलेला आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी उशिराने पण कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असून आजपासून दिवसातून एक वेळेला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनवरील पकडीने, तसेच त्यांच्या अभ्यासाने कराडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ हालचाली झाल्याने कराडला पाणी यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे कराडकरांनी या निर्णयाबाबत, तसेच पृथ्वीराज बाबांच्या समयसूचकतेबाबत आंनद व समाधान व्यक्त केला आहे.