कराड उत्तर मध्ये १५.३० कोटीचा निधी मंजूर
मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश

उत्तर कराड / प्रतिनिधी : –
राज्यातील महायुती सरकारकडून कराड उत्तरमधील रस्तेविकासासाठी कराड उत्तर निवडणूक प्रमुख मन्तेज़दादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे पुस्तुम्मी अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये १५ कोट्टी, २० लाखाचा निधी महायुती सरकारकडून मंजूर झाला आहे. या निधी मधून कराड उत्तरमधील गावातील रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण दळणवळणाला चालना मिळणार आहे.
कराड उत्तरमधील विविध रस्ते कामांसाठी मनोजदादा घोरपडे सातत्याने प्रयत्नशील होते. त्याअनुषंगाने त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होती व या निधीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार पुरवणी अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत या कामांचा समावेश करून विकासकामांसाठी १५.३० कोटी निधीची तरतूद केली आहे. यामध्ये डोंळेगाव पाडळी ते इजिमा ६६ (सोनापूर) रस्ता, ग्रामा २२५ भाग डॉळेमाव ते पाडळी ची सुधारणा करणे. मांडवे, पाडळी, नागठाणे प्रििज.मा ३२ भाग निनाम गावातील बंदिस्त गटार आर सी सी सह सुधारणा करणे. मांडवे पिरेवाडी ते निवडुंगवाडी रस्ता प्र.जि.मा १५६ येथि लहान पूल बांधणे. मांडवे, पाडळी, नागठाणे, बोरगाव प्र.जि.मा ३२ भाग मांडवे ते मांडवे धरण रुंदीकरणासह सुधारणा करणे. जायगाव, कण्हेरखेड प्र.जि.मा १५९ भाग जायगाव ते कण्हेरखेडची सुधारणा करणे, कोरेगाव एकंबे जायगाव अंधेरी रस्ता भाग अंधेरी फाटा ते प्र.जि.मा ३५ ची सुधारणा करणे इ. कामांना मंजुरी मिळाली आहे.
| मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड उत्तरमधील महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या निधीसाठी खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कंदम, जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील जप पदाधिकारी यांचे
संहकार्य लाभले.