मसूर स्टेशन ते ओव्हर ब्रिज काँक्रिटीकरणचे काम उत्कृष्ट करा – रामकृष्ण वेताळ

कराड / प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ठाणे सातारा तथा राज्य उत्पादक शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनातून भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला मसूर रेल्वे स्टेशन ते ओव्हर ब्रिज कोणेगाव रोड गेट नंबर 93 पर्यंत काँक्रिटीकरण रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरण करणे. या विकासकामाचा भूमिपूजन समारंभ भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप साळुंखे, पवन निकम, सरपंच रमेश चव्हाण, कोयना बँकेचे संचालक राजेंद्र पाटील, चेअरमन अनिल सपकाळ, संदीप चव्हाण फौजी, सरचिटणीस जितेंद्र मोरे, अशोक चव्हाण, गणपत चव्हाण, आनंदराव चव्हाण, युवराज चव्हाण, गणेश सपकाळ, युवराज सपकाळ, संजय कांबळे गावचे ग्रामस्थ, भारतीय जनता पदाधिकारी उपस्थित होते.