आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

देश सेवा व स्वामी कार्याची सेवा घडो – गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे

गुरूमाऊलींच्या हिजगूज वेळी वरूणराजाचे आगमन ; महासत्संग सोहळ्यास लाखों भाविकांची उपस्थिती

 

कराड / प्रतिनिधी :-
सातारा जिल्ह्यात गेल्या तीस चाळीस वर्षात स्वामींचे कार्य वाडी वस्त्या तळागाळात पोहचवण्याचा हेतू एवढाच आहे की सर्वांना दुख मुक्त करणे, चिंता मुक्त करणे आणि समस्या मुक्त करणे ते ही विनामुल्य मार्गदर्शनातून करणे. खर तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आजतागायत जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. आणि या समृद्ध अवस्थेत या देशाला भारत माता म्हणतात ते केवळ आमच्या माता भगिनींमुळे म्हणतात. आपल्या हातून आपल्या जिल्ह्यांमध्ये हे स्वामींचे कार्य अधिक गतीमान होवो उभयतांच्या सार्या समस्यांचे निवारण होवो. आणि आपणाला स्वामींचा आशीर्वाद सुख समाधान मिळो अशी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या हातून या देशाची सेवा घडो स्वामी कार्याची सेवा घडो एवढीच कळकळीची भारत मातेला विनंती करतो. असे मत परमपूज्य गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी हितगुज माध्यमातून संवाद साधताना व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सातारा जिल्हा आयोजित आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, अष्टसिद्धी महाशक्तीपिठाचे पिठाधीश आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळा लाखों भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी परमपूज्य गुरूमाऊलींचे प्रासादिक अमृततुल्य हितगुजातून संवाद साधत असताना वरूणराजाचे आगमन झाले.
गुरूमाऊली म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रातून अनेक वर्षाची प्रतीक्षा करत असताना वरुण राजाला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तो आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीत आहे आणि आपण सह्याद्री वरची माणसं आहात तो आशीर्वाद झेलण्याइतपत सामर्थ आपल्याला स्वामींनी दिलेले आहे. तशी ही पुण्यभूमी थोरा-मोठ्यांची आहे वीर पुरुषांची आहे. कृष्णा कोयना या जल देवतांची आहे, जलवाहिन्यांची आहे. अशा पुण्यभूमीचे वर्णन मराठीत तरी करणं अशक्य आहे, शब्द कमी पडतात. अशा थोर पुण्यभूमीत आपण अनेक दशकापासून स्वामींची सेवा करत आहात. या पुण्यभूमीला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, साधू ,संत, थोर, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजेसारख्या, महापुरुषांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. तसेच अनेक राजकीय वारसा असणाऱ्या महर्षी या पुण्यभूमीत जन्मलेत त्यात किसन वीर असतील आमचे यशवंतराव चव्हाण साहेब असतील यांना महाराष्ट्राचे थोर सुपुत्र म्हणून भारत देशांने संबोधलेले आहे. अशा पुण्यभूमीत आपण आपलं कर्तव्य, आपला कर्मयोग, भक्तीयोग आपण अनेक वर्षापासून या पुण्यभूमीत वास्तव्य करत आहात. परंतु आज खूप मोठ्या धैर्याने आपण हे निसर्ग आपत्ती बाजूला ठेवून कुठली ही भीती न बाळगता आपण या ठिकाणी उपस्थित झालात, महाराज कधी कधी परिक्षा बघतात पण तुम्ही सर्वजण या परीक्षेत पास झाले आहात.
गुरूमाऊली म्हणाले, खुप आशेने आपण एवढ्या वादळात येण्याचे आणि वादळात बसण्याचे सामर्थ्य दाखवत आहात. मी आपणाला शुभेच्छा देईन की पुन्हा एकदा आपण सातारा जिल्ह्यात योग्य समय निवडून पावसाचा अंदाज घेऊन आपण पुन्हा एकदा असाच उपक्रम आपल्या जिल्ह्यांमध्ये योग्य त्या तारखेला नक्की येऊन आणि राहिलेली जी भूक आहे अनेक वर्षांची ती निश्चितपणे आपणाला पुर्ण करता येईल यात दुमत नाही .
या सोहळ्यामध्ये सकाळी ११ वाजल्यापासून विनामुल्य मार्गदर्शन करण्यात आले. बालसंस्कार विभाग बालमनावर सुसंस्कार रुजवणे त्यांना नैतिक व चारित्र्याचे संवर्धन तसेच विद्यार्थी सर्वगुण संपन्न घडवणे या विषयी मार्गदर्शन. कृषी विभाग रासायनिक खताचा वापर न करता कमीत कमी खर्चात शेतीचे उत्पन्न वाढवणे, संद्रीय शेती, सात्विक शेती, शेतीचे वास्तुशास्र याविषयी सखोल मार्गदर्शन.आरोग्य व आयुर्वेद विभाग आरोग्य शिबीर, नाडी परीक्षण, विनामुल्य आरोग्य तपासणी व आयुर्वेद औषध भांडार.भारतीय संस्कृती ,मराठी अस्मिता विभाग वर्षभरातील सण,वार, व्रतवैकल्ये या विषयी मांडणी आणि मार्गदर्शन.प्रश्नोत्तर विभाग मानवी समस्या, विवाह, आरोग्य, नोकरी, कोर्ट कचेरी, आर्थिक यासर्व समस्या वर मार्गदर्शन. वास्तूशात्र विभाग योग्य व अयोग्य वास्तू याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

विवाह संस्कार विभाग उपवर मुला मुलींची नोंदणी करून व विवाह संस्कार या विषयी मार्गदर्शन.युवा प्रबोधन विभाग युवकांना करिअर गाईडन्स, व्यसनमुक्त, राष्ट्र आणि आपली कर्तव्य या विषयी मार्गदर्शन.गर्भसंस्कार व पालकत्व विभाग गर्भस्थ बालकावर संस्कार अर्थात गर्भसंस्कार व पालक या विषयी मार्गदर्शन.पारंपारिक वस्तू प्रदर्शन पारंपारिक पूर्वा पार वस्तूंचे प्रदर्शन.पर्यावरण, कायदेविषयक विभाग ,स्वयंरोजगार, वेद विज्ञान, प्रशिक्षण, पशु व गौवंश, माहिती तंत्रज्ञान,देश विदेश अभियान व प्रशासकीय विभाग या विषयी विनामुल्य मार्गदर्शन करण्यात आले.

 

Related Articles