आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्या
किरण पाटील मित्र परिवाराच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी वाटप

कराड / प्रतिनिधी :-
किरण पाटील मित्र परिवाराच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शाहू चौकात जिलेबी वाटप करण्यात आले. किरण पाटील मित्र परिवार दरवर्षी शाहू चौक येथे विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी कौतुक केले.

कराड नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती किरण पाटील हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. तसेच पूर परिस्थितीसह अस्मानी संकटाच्या वेळीही किरण पाटील मित्र परिवार धावून जात गरजूंना मदतीचा हात देत असतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून किरण पाटील मित्र परिवाराने येथील शाहू चौकात जिलेबी वाटप करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
या उपक्रमास खा.श्रीनिवास पाटील, युवा नेते सारंग बाबा पाटील, जयंत काका पाटील, मा नगरसेवक अतुल शिंदे, मा नगरसेवक गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, प्रमोद शिंदे, बाबासाहेब कळके,संजय शिंदे,नासिर नायकवडी, अशपाक नायकवडी, बबलू नायकवडी, अल्ताफ शेख, सतीश भोंगाळे, तोफिक नायकवडी, विनायक चावडीमनी, निखिल ठोंबरे, रियाज नायकवडी, विनोद वोरा, नियाज नायकवडी, शकील खान, आनीस खान, मुन्ना खान, बरकत भाई, विजय जिरंगे, योगीराज जिरंगे, अभिजीत घाडगे, प्रसाद होनकळसे, महेश लाड, हेमंत लाड, निलेश झेंडे, नागेश झेंडे, सार्थक पाटील, सौरभ पाटील, साहिल मुल्ला, अमोल हर्डीकर, तुळशीदास चावडीमनी, लाला बागवान, तोसिफ बागवान, नजीर नायकवडी, अल्ताफ शेख, अरुण शिंगणे, राकेश सावंत, बाळासाहेब मोरे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.