ताज्या बातम्यासातारा जिल्हा

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध – गणेश भेगडे

 

कराड / प्रतिनिधी:-

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कल्पक नेतृत्वाच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे असे प्रतिपादन भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. ते कराड येथे आयोजित भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आढावा बैठकीमध्ये बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सचिव भरत पाटील, मनोज घोरपडे आणि किसान मोर्चा प्रदेशाची रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा कार्यकारणीची आढावा मीटिंग कराड येथे आज संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना श्री भेगडे म्हणाले शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा हा महाराष्ट्रात कार्यरत आहे. या मोर्चाच्या सर्व सदस्यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहावे. या कार्यक्रमात बोलताना प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ म्हणाले भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोरोना काळात शेतकऱ्यामुळेच हा देश सावरला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहू या. या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम, भरत पाटील, मनोज घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि सातारा जिल्हा किसान मोर्चा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामकृष्ण वेताळ यांनी केले तर आभार विकास गायकवाड यांनी मांडले।या कार्यक्रमाला प्रदेश सचिव रोहित चिवटे, रघुनाथ सोळंके कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जय शिंदे दादासो सावंत दादा आवळे सातारा जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे उपाध्यक्ष सुरेश पाटील तालुकाध्यक्ष महेश कुमार जाधव जिल्हा उपाध्यक्ष विकास गायकवाड भरत देसाई किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले माजी पं.स. सदस्य चंद्रकांत मदने सुरेश कुंभार सूर्यकांत पडवळ शंकरराव शेजवळ शहाजी मोहिते तुकाराम नलवडे मज्जित पटेल रणजीत थोरात सोशल मीडिया प्रमुख रवींद्र लाहोटी तालुका अध्यक्ष अंजली जाधव दिपाली खोत जिल्हाध्यक्ष वनिता माने रुक्मिणी जाधव नम्रता कुलकर्णी बाळासाहेब पोळ विकास पवार यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *