सातारा जिल्हाहोम

आगाशिवनगर येथे २९ जुलैला श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम; सव्वा लाख मंत्रांचे हवन, महाअभिषेक व महाप्रसाद

कराड/प्रतिनिधी : –

आषाढ शुद्ध पौर्णिमेनिमित्त अर्थात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आगाशिवनगर (मलकापूर) येथील नियोजित श्री तिरुपती बालाजी धाम, श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, आगाशिवनगर दरबार यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यानिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत रक्तदान शिबिराचेही आरोजन करण्यात आले आहे. या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविक व सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा व महाअभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता स्वामींची भूपाळी आरती होईल. सकाळी ९ वाजता तब्बल १ लाख २५ हजार श्री स्वामी समर्थ मंत्रांचे हवन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता स्वामींची महानेवैद्य आरती व आरतीनंतर श्री राजेश पवार (दादा) यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ११.३० वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत हवन, सायंकाळी ५ वाजता श्री औदुंबर प्रदक्षिणा, तर सायंकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानेवैद्य आरती होणार आहे. रात्री ८ वाजता गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होईल.

उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजताच्या भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद प्रत्यक्ष स्वामींच्या मूर्तीत घेण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दुपारी ४ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर (आगाशिवनगर), पासून खाली, आनंद नगरी रो-बंगलोज जवळ, शिंदे कॉलनी, श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, आगाशिवनगर दरबार, कराड होणार आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच नियोजित श्री तिरुपती बालाजी धाम, आगाशिवनगर दरबार, कराड येथे भव्य भूमिपूजन सोहळा लवकरच संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles