सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत ४४ जण रिंगणात, 53 जणांची माघार 

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मंगळवारी (दि. ९) तब्बल ५३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात ४४ उमेदवार शिल्लक राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.

अर्ज माघारीनंतर कारखान्याच्या २१ संचालकांच्या जागांसाठी आता जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल या दोन प्रमुख पॅनेलमध्ये थेट लढत रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. परंतु, यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांचेही अर्ज बाकी राहिल्याने संबंधित दोन ऊस उत्पादक गटातील चुरस वाढणार आहेत. आज बुधवारी (दि. १०) चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १३९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर १२२ अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीच्या अंतिम टप्प्यात ५३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता ४४ उमेदवार निवडणूक मैदानात उरले आहेत. यामध्ये दोन्ही पॅनलचे २१-२१ उमेदवारांमध्ये लढत होणार असून, दोन अपक्ष उमेदवार ही निवडणूक रिंगणात असल्याने संबंधित दोन ऊस उत्पादक गटांमधील निवडणूक चुरशीची होणार आहे.

दरम्यान, माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच दोन्ही प्रमुख गटांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनल’ आणि कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते यांच्या विचारांशी निष्ठा व्यक्त करणाऱ्या ‘कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल’ यांच्यात सरळ सामना होणार आहे. काही गटांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता असली तरी निवडणुकीचे मुख्य केंद्रबिंदू हीच दोन पॅनेल राहणार आहेत.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कराड, वाळवा, कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माघारीनंतर इच्छुकांची समजूत काढणे, कार्यकर्त्यांची बांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंनी नियोजन सुरू झाले आहे. चिन्हवाटपानंतर प्रचाराच्या सभांपासून घरभेटींपर्यंत सर्वच स्तरांवर निवडणूक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली-दुशेरे) : धोंडीराम शंकरराव जाधव (दुशेरे), जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव हवेली), आनंदा सोपान खबाले (विंग)

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे-काले) : अरविंद गुणवंतराव पाटील (आटके), दयाराम भिमराव पाटील (काले), बाजीराव नारायण थोरात (कार्वे)

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे-नेर्ले) : दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार), लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे), संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले)

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव-रेठरे हरणाक्ष) : जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष), सत्यजीत जितेंद्र पाटील (बोरगाव), सुनिल भिमराव पाटील (कामेरी)

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र-वांगी) : संग्राम विश्वासराव पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्रे)

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक-शेणोली) : सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बुद्रुक), बाजीराव दाजी निकम (शेरे)

महिला राखीव : सुजाता दिपक जाधव (कापील), सुनिता संजय शेवाळे (सवादे), अनुसूचित जाती-जमाती राखीव, छबन जगन्नाथ कांबळे (कोळे)

भटक्या विमुक्त जाती-जमाती / विशेष मागास प्रवर्ग : अविनाश मधुकर खरात (खरातवाडी)

इतर मागास प्रवर्ग : बाळासो आकाराम जगताप (कोडोली)

कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते पॅनलचे अधिकृत उमेदवार

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ : आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप, दुर्योधन पांडुरंग खबाले

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ : संतोष नागनाथ थोरात, प्रतापराव वसंतराव पाटील, शांताराम शंकर पाटील

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ : सुरेश (सुभाष) बाबुराव पाटील, सुभाष उद्धव पाटील, किरण दिलीप पाटील

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ : जयकर शिवाजी शिंदे, महेश राजाराम पवार, महेश अशोकराव पाटील, उदयसिंह प्रतापराव शिंदे

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ : माणिकराव आनंदराव मोरे, सुरेश गणपती पाटील

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ : अविनाश जगन्नाथ मोहिते, दिपक, रामचंद्र (धोंडी) कणसे

महिला राखीव : अर्चना अविनाश मोहिते, विजया उत्तमराव पाटील

अनुसूचित जाती-जमाती राखीव : सुधीर गोविंद रोकडे

इतर मागास प्रवर्ग : प्रकाश बाळकृष्ण श्रिखंडे

भटक्या विमुक्त जाती-जमाती / विशेष मागास प्रवर्ग : दिलीप तुकाराम गलांडे

Related Articles