सातारा जिल्हाहोम

विंगच्या श्रद्धा कचरेचे दहावीत यश

कराड/प्रतिनिधी : – 

तालुक्यातील विंग गावातील श्रद्धा आबासाहेब कचरे हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 86.59 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आदर्श विद्या मंदिर विंग हायस्कूलमध्ये तिने सातवा क्रमांक पटकावत गावाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे विंग परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रद्धाच्या या यशाबद्दल स्व. दत्तात्रय कचरे स्मारक समिती, विंग यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अनिल आण्णासाहेब कचरे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. यावेळी तिच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करण्यात आले.

भविष्यातही उच्च शैक्षणिक यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.

या कार्यक्रमास युवा उद्योजक अक्षय पाटील, साईभक्त व उद्योजक माणिक कचरे यांच्यासह कचरे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धाच्या यशामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles