संतकृपा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड

कराड/प्रतिनिधी : –
श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी), घोगाव या महाविद्यालयात नुकतीच झायडस लाईफसायन्स लि., गोवा यांच्यातर्फे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस ड्राईव्हद्वारे महाविद्यालयातील प्रणय लोटळे, आदित्य कुचेकर, हरीश काळे, आदित्य कुंभार, धीरज पवार, बालाजी जगताप आणि तुषार साठे यांचा समावेश आहे. या यशस्वी निवडीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
या कॅम्पस ड्राईव्हसाठी झायडस लाईफसायन्स लि. चे एच. आर. राम पाटील, विक्रांत कदम आणि गजेंद्र हे घोगाव येथे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. पूजा भोसले यांनी केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.