सातारा जिल्हाहोम

आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस साधेपणाने; सर्व कार्यक्रम रद्द

अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; बाहेरगावी असल्याने शुभेच्छाही स्वीकारणार नाहीत 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मे रोजी आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार मनोज घोरपडे युवा मंच आणि भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून, त्याच पार्श्वभूमीवर आमदार मनोज घोरपडे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचाही विचार करून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

यामुळे २६ मे रोजी नियोजित असलेले स्वागत समारंभ, सत्कार कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार घोरपडे हे २६ मे रोजी बाहेरगावी असणार असल्याने ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठीही उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या समर्थकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी कराड उत्तर व युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles