कृष्णा कारखान्याचा ई.व्ही. चार्जिंग स्टेशन व एम.पी.डी. पंप कार्यान्वित
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उद्घाटन; वाहनधारकांना होणार लाभ
कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित नवीन ई. व्ही. चार्जिंग स्टेशन व एम. पी. डी. डिझेल, पेट्रोल पंप कार्यान्वित करण्यात आला. याचे उद्घाटन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात झाले. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे.
कार्यक्रमाला संचालक संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलास भंडारे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, केंद्र शासनाचा प्रदूषण रोखण्याचा मानस आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्यानेही ई. व्ही. चार्जिंग स्टेशन उभारले आहे. इलेक्ट्रिक वाहन ऊर्जेमुळे धूर आणि कार्बन उत्सर्जन कमी होते, त्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो. त्याचबरोबर सीएनजी स्टेशनची सुविधा यापूर्वीच दिली असल्याने याचा निश्चितपणे फायदा परिसरातील सर्व वाहनधारकांना होणार आहे.
मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


